अहमदनगर Live24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका २४ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या देवळाली प्रवरा परिसरातील गांधीवाडी येथे घडली.
कोमल प्रदीप वाघ हे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता गांधीवाडी (देवळाली प्रवरा) येथील कोमल वाघ राहत्या घरातून बाहेर पडली होती.
दरम्यान सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या लिंबाच्या झाडाला साडीचा पदर अडकवून कोमल गळफास घेतलेल्या अवस्थेत शेजारील नागरिकांना दिसून आली.
यावेळी आरडाओरड झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.कोमलला तत्काळ राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर कोमलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत कोमलला दोन चिमुकली मुले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोमलच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®