ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकींग: शहरात तरूणांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच, आज पुन्हा तरूणाने घेतला गळफास

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  शहरात तरूणांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी बोल्हेगावातील तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

आज दातरंगे मळात एका तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्र नागेश नामन (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

महेंद्र नामन याने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने सिंलींग फॅनला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

महेंद्र याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

शवविच्छेदन सुरू असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office