अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे एका अल्पवयीन मुलीचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आलीय.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौंदाळा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी मुलगी शनिवार दि.20 जून रोजी रात्री तिच्या मोठ्या बहिणी सोबत गावातील घरात झोपली होती.
रविवार सकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यावर तिला झोपेतून उठविले असता ती झोपेतून उठली नाही. सर्पदंश झाला असेल असे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरने तपासून ती उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले.
ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चे खबरी वरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीचा मृत्यू सर्पदंशानेच झाला असल्याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तिच्या पायावर जखमा दिसून आल्या असून शरीर काळे-निळे पडल्याचे आढळून आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews