अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हे पुन्हा एकदा वाढले आहेत, खून बलात्कार व विनयभंग ह्या घटनांनी जिल्हा रोजच हादरत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका व्यक्तीचा (वय ७०) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. साहेबराव मुक्ताजी चव्हाण असे मयत व्यक्तीचे नाव असून आज पहाटे त्यांचा मृतदेह घराजवळ संशयास्पद आढळून आला.
धक्कादायक म्हणजे मयत व्यक्ती ही भोसे गावचे पोलिस पाटील यांचे वडील आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान मयत व्यक्तीच्या डोळ्यावर रक्त दिसत असल्याने खून झाला की अजून काही अशा चर्चांना सध्या परिसरात उधाण आले होते ,डोळ्याजवळ रक्त असल्याने सुरुवातीला शंका निर्माण झाली होती.
शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यु कशामुळे झाला हे निष्पन्न होईल. तसेच शवविच्छेदनासाठी मृत्यदेह बाहेर पाठविल्यास अचूक अहवाल येईल, अशीही माहिती पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे.