अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- घरघुती वादातून सासऱ्याने मित्रांच्या मदतीने दारुच्या नशेत लोखंडी पाइप व तलवारीने वार करून जावयास ठार केले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शुक्रवारी पहाटे घडली.
मयूर आकाश काळे (वय २८, मूळ कर्जत, हल्ली मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. सासरा फरार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि वडिलांच्या निधनानंतर मुलीने पतीला माहेरी आणून तेथेच राहणे पसंत केले. त्यामुळे मूळचा कर्जत येथील मयूर काळे हा पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे रहात होता.
काही दिवसांनंतर आईने तेथीलच सचिन काळे याच्याशी दुसरा विवाह करून घर सोडले. मुलगी व जावयाकडे असलेल्या दागिन्याच्या मागणीसाठी आईने पती सचिन काळे याला मित्रांसोबत मुलीकडे पाठवले.
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सचिन काळे (मुठेवाडगाव), संदीप काळे, सूरज काळे (भेंडाळा, ता. गंगापूर) व बुंदी भोसले (मिरजगाव, ता. कर्जत) हे मयूरच्या घरी गेले.
त्यांनी मयूर व त्याची पत्नी मोनिका (वय २३) यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. ते सर्व दारुच्या नशेत होते. वाद विकोपाला गेल्यानंतर सचिनने लोखंडी पाइप, तलवार, दांडा व दगडाने मयूरला मारहाण केली. त्यात मयूरचा मृत्यू झाला.
त्यांनी मोनिकालाही मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. मयूरचा भाऊ तैमूर काळे वाद सोडवण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याचे घर पेटवून दिले.
शुक्रवारी मोनिका काळे हिने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी सचिन काळे, संदीप काळे, सूरज काळे व बुंदी भोसले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®