अहमदनगर ब्रेकींग: शिक्षक अल्पवयीन मुलीला शाळेत म्हणतो, माझे तुझ्यावर प्रेम आहे….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  हायस्कूलमध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला. नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये ही घटना घडली.

अक्षय अनिल आढाव (रा. आढाववाडी ता. नगर) असे चाळे करणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक आढावविरूध्द भादंवि कलम 354, 354 (अ), 354 (ड), 506, पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. त्या शाळेत शिक्षक असलेला अक्षय आढाव हा फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला मागील एक महिन्यापासून त्रास देत आहे.

मुलगी शाळेत आल्यानंतर व शाळेतून घरी गेल्यानंतर फिर्यादी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण एकांत्तात भेटू, असे वारंवार म्हणून मुलीचा विनयभंग केला.

हा प्रकार मुलीच्या घरच्यांना कळाल्यानंतर शिक्षक आढाव याने फिर्यादी यांच्या भावाला फोन करून मारहाण करत हातपाय तोडण्याची भाषा केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक जाधोर यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर करीत आहेत.