अहमदनगर ब्रेकिंग : मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी, 30 जण जखमी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :-  मुंबईहून परभणीकडे मजूर घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यातील तब्बल 30 मजूर जखमी झाले आहेत. आज सकाळी पाथर्डी तालुक्यातील येळी फाटा येथे हा अपघात झाला.

लॉकडाऊन सुरु असल्याने विशाखापट्टणम महामार्गे मुंबईहून काही मजूर परभणीकडे टेम्पोतून जात होते. या दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील येळी टोलनाक्याजवळ ४०७ टेम्पो चालकाला मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास डुकली लागली.

यात चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पा रस्त्यावरुन खाली जात पलटी झाला. या अपघातात २५ ते ३० नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे.

या घटनेची माहिती मिळाताच, पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून तातडीने पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघात दरम्यान तत्परता दाखवत रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांनी व येळीचे नामदेव बडे यांनी अपघातातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात येऊन, नागरिकांसह लहान मुलांना खाण्याची व्यवस्था केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24