अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 302 च्या गुन्ह्यात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 2017 मध्ये भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमेश काळे या इसमाचा खून झाला होता. या प्रकरणात भिंगार पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली.
त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणातील रमेश काळे याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्या अहवालात सदरचा मृत्यू हा इथेनॉलची दारू आणि मारहाणीमुळे झाल्या असल्याचे स्पष्ट झाले होते.त्यानंतर तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी या प्रकरणातील आरोपी 302 सारख्या गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेस पात्र आहेत असा अहवाल दिला होता.
एक वर्ष हा अहवाल पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी कुठलीही कारवाई न करता हा गुन्हा पेंडिंग ठेवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली असता त्यांना हा गुन्हा अकस्मात मृत्यूच्या नोंदीमध्ये नोंद असल्याचा दिसला.
३० डिसेंबर २०२०ला पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे भिंगार पोलीस ठाण्याचे निरीक्षणासाठी गेले असता त्यांना इतका गंभीर गुन्हा अकस्मात मुत्यूचा नोंदीत सापडला त्यानंतर पोलीस अधिक मनोज पाटील यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते . मात्र प्रवीण पाटील यांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात हलगर्जीपणा केल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणातील या प्रकरणात मयताची पत्नीने जबाबात म्हटले आहे. या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तिने सांगितले. दि. 21/02/2017 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मी माझा नवरा रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे व मुले असे आमचे पञ्याच्या शेडमध्ये असतांना बाहेर मोटारसायकल आल्याचा आवाज आला.
माझ्या नव-यास हाक मारुन घराबाहेर येण्यास सांगितले. तेव्हा मी व माझा नवरा रमेश उर्फ रमाकांत घराबाहेर गेलो असता, यावेळी घराबाहेर तीन लोक आले होते. ते लोक मला व माझ्या नव-यास म्हणाले, आमच्याकडे मोठी बकरी मेलेली आहे.
तुम्ही आमचे सोबत घेण्यास चला असे म्हणाल्याने मी व नवरा रमेश त्यांचे एका मोटार सायकलवर बसले. दुस-या मोटार सायकलवर नवरा असे आम्ही त्यांचे मोटारसायकलवर बसून ते आम्हाला काटवनात घेऊन आले. आम्ही काटवनात गेलो तेव्हा आमचे ओळखीचा असलेला जावेद रौफ शेख (रा. मोमीन गल्ली भिंगार ता. जि. अहमदनगर) हा तेथे थांबलेला होता.