अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- कोपरगाव शहरातील मनाई वस्ती संवत्सर येथील २२ वर्षांच्या विवाहितेचा शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

संसर्गजन्य आजाराचा तालुक्यातील हा तिसरा बळी आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले, या महिलेला सर्दी, खोकला व कफ झाल्याने दम लागत होता.

शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. डॉ. विजय गणगोटे यांनी प्राथमिक तपासणी करून तातडीने उपचार सुरू केले.

महिलेची स्थिती नाजूक होत चालल्याने पुढील उपचारांसाठी दाखल करण्याची तयारी करत असताना तिचा मृत्यू झाला.

लक्षणांवरुन या महिलेचा मृत्यू सारी आजाराने झाल्याचा संशय असून घशातील स्राव तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आला आहे.

अहमदनगर

Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24