अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- राहता तालुक्‍यातल्या प्रवरानगर परिसरात घोरगे वस्ती भागात राहणारी तरुणी रामेश्वरी शिवाजी गायकवाड, {वय १९} ही दि. २२ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास

तिची आई मीना यांच्याशी घरगुती किरकोळ कारणावरुन शाब्दिक भांडण झाल्याने घरात कोणाला काहीही न सांगता निघून निघून गेली.

याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी लोणी पोलीस ठाण्यात खबर दिली.त्यानुसार पोलिसांनी ‘मिसिंग’ नंबर ४३ ने गुन्हा नोंदविला.

मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता राजेश्वरी गायकवाड ही तरुणी मृत अवस्थेत मिळून आली. तिचा मृतदेह घोगरे यांच्या शेततळयात मिळून आला.

त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी लोणीच्या पीएमटी रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, मयत रामेश्वरी ही कॉलेजला शिक्षण घेत होती.

तिचा मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. मात्र मृत्यू नेमका कसा झाला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24