अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका रुग्णास आणण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जात असताना रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना रविवारी नगर शहरात घडली.
या घटनेचा रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेने निषेध केला असून सर्व रुग्णवाहिका चालकांनी बंद पाळला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहरातील एक रुग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी जात होती.
यावेळी पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा चालक अक्षय वाघमारे यास बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती सर्व रुग्णवाहिकेच्या चालकांना कळताच चालक संघटनेच्या वतीने पोलिसांच्या निषेधार्थ बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्ही पण अत्यावश्यक सेवेसाठी मदत करीत आहोत. तुम्ही पण करता? पण रुग्णवाहिकेच्या चालकांना मारहाण करणे योग्य नाही.
मारहाण करणाºया पोलिसांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चालक संघटनेच्या वतीने केली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com