अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकावर एका उस तोडणी मजूर महिलेने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला.
याबबत सविस्तर असे कि, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव केरू पोकळे हे व त्यांची पत्नी सलाबाई हे दोन लेकरांसह दौड शुगर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आले होते.
सलाबाई या गरोदर होत्या. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी त्या पतीबरोबर ऊस तोडत होत्या.
पोटात दुखू लागल्याने श्रीगोंद्यात बसने जाण्यासाठी निघाल्या असताना पेडगाव बसस्थानकावर त्यांची प्रसुती झाली.
विशेष म्हणजे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नसतानाही आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुखरुप आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com