अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- विवाहितेला तिचा पती व नणंदेने गळा आवळून व तोंडात बळजबरीने औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारातील घोडकेवाडीत ही घटना घडली.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित कोमल राहुल घोडके (रा. घोडकेवाडी, घोसपुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पती राहुल बबन घोडके व नंनद मीना संजय झरेकर (दोघे रा. घोसपुरी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित विवाहिता ही पती व मुलांसह सासरी नांदत होती. कौटुंबिक वादातून पीडितेने 2020 साली महीला दिलासा केंद्रात पती राहुल व नंणद सविता व मिना या मानसिक व शारीरीक छळ करत असल्याची तक्रार दिली होती.
मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेच्या वडीलांची समजूत काढून तिला पुन्हा नांदविण्यास नेले होते. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी सायंकाळी पीडिता ही गायींना खुराक चारत असताना तिची नणंद मीना हिने माझ्या गायांना खुराक चारु नको, मी माझी चारीन, असे सांगितले.
यावेळी तिच्या पतीने पीडितेच्या अंगावर धावून जात तिच्या शर्टची कॉलर आवळून तिचा गळा दाबला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर पोडितेच्या तोंडात जबरदस्तीने औषध ओतले. यावेळी नणंद मीना हिने हिला आज खपवून टाक, हिचं खूप झालं आहेफ, असे म्हणत नवर्याला प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक यु. ए. चव्हाण करत आहेत.