ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग ! या ठिकाणी प्रवाशी बस पलटली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या पुणे इंदोर प्रवाशी बसचा राॅड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला बस पलटी झाल्याची घटना राहाता तालुक्यात घडली आहे.

या बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची पुणे-इंदोर बस पुण्यावरून इंदोरला जाण्यासाठी चार वाजता निघाली होती.

नगर मनमाड महामार्गावर राहाता येथील न्यायालय जवळ आली असता साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास गाडीचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा व नियंत्रण सुटले होते.

प्रसंगावधान राखत चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला एकाबाजूने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते बस जागेवरच पलटी होऊन जागेवरच स्थिरवल्याने मोठा अनर्थ टळला व चालक-वाहक याचेसह सर्व प्रवाशांचे जीव वाचले.

अपघातस्थळा जवळ असलेल्या वस्तीवरील नागरिकांनी तातडीने बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. जखमींना तातडीने राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून उपचारार्थ दाखल केले.

Ahmednagarlive24 Office