अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये तरुणीसह पोलिसांनी रंगेहात पकडले. !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोपरगाव शहरातील अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा मुलगा मोसिन सय्यद याला एका तरुणीसह सावळीविहीर येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी रंगेहात पकडले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांसह हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मुलाचे

सावळीविहीर येथे हॉटेल वेलकम व एसार रिसोर्ट असून बुधवारी दुपारी काही युवक-युवती तेथे आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना समजले.

त्यांनी शिर्डीचे पोलिस निरीक्षक औताडे व सहायक निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक त्वरित हॉटेल वेलकममध्ये पाठवले. या पथकाने रूमची झडती घेतली असता तेथे एक पुरुष व महिला आढळली.

मोसिन मोहम्मद सय्यद (वय २९, गांधीनगर, कोपरगाव) असे त्याचे नाव आहे. माेसिनने लॉजवर रूम घेतली होती. एक महिला त्याच्यासोबत होती. लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल बंद असताना मॅनेजर रामहरी जानराव काळे याने हॉटेल चालू ठेवले होते.

तोंडाला मास्क न बांधता, तसेच प्रशासनाची परवानगी न घेता, नोंद न घेता मॅनेजरने रूम दिली. या प्रकरणी मोसिन मेहमूद सय्यद, हॉटेल मॅनेजर काळे व एका महिलेविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24