अहमदनगर ब्रेकिंग! शहरातील या ठिकाणचे एटीएम चोरांनी फोडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सण अवघ्या काही दिवसनावर येऊन ठेपला आहे. त्यातच जिल्ह्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.

दरम्यान शहरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरला असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम चोरांनी आज पहाटे फोडले. आजूबाजूच्या लोकांना जाग आल्यानंतर एटीएम मशीन पळण्याच्या तयारीत असलेल्या चोरांनी तेथून पोबारा केला. पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चोरटे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले होते. चोरांना एटीएम मशीन मधील रक्कम असलेली पेटी फोडता आली नाही. त्यानंतर चोरांनी एटीएम मशिनला लोखंडी साखळी बांधून स्कार्पिओच्या मदतीने सेंटरमधून उखडून काढले. तीव्र थंडी असल्यामुळे रस्त्या कोणीही नसल्याचा फायदा चोर घेत होते.

मशीन उखडत असताना झालेल्या आवाजाने अपार्टमेंटमधील काही लोकांना जाग आली. अपार्टमेंटच्या खाली काहीतरी हालचाली चालू आहेत, असा संशय आल्याने अपार्टमेंटमधील लोकांनी डोकविण्यास सुरुवात केली. लोक जागे झाले असल्याचे पाहून चोरांनी मशीन तेथेच सोडून पळ काढला.

घटनेची माहितीनंतर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे आणि सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चोरीचा प्रयत्न झाला म्हणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सुरसे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24