अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत्या पुतण्याचा नदीच्या वाहत्या पाण्यात तोल जाऊन वाहुन गेले.
पाण्याचा प्रवाह जादा आसल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. जामखेड तालुक्यात सध्या मागिल अठवड्यापासुन जोरदार पाऊस पडत आसल्याने तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसांडून वहात आहेत.
चौडीं येथील सीना नदीला देखील पुर आला आसुन येथील के टी वेअर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. आज सायंकाळी येथे राहाणारा पुतण्या तुषार गुलाबराव सोनवणे वय २२ त्याचे चुलते सतीश बुवाजी सोनवणे वय ४३ व इतर एक आसे तीघे जण मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते.
चलते पुतणे हे या केटीवेअर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला मासे पडत होते तर तीसरा हा बंधाऱ्याच्या बाजुला बसला होता. याच दरम्यान पाण्याचा वेग जादा आसल्याने या मध्ये चुलता व पुतण्या हे पाण्यात पडुन वाहुन गेले.
ही घटना बाजुला उभ्या आसलेल्या दुसर्या मुलाने गावात जाऊन सांगितली यानंतर सदर ची घटना लक्षात आली. घटनेची माहिती समजताच तहसीलदार विशाल नाईकवाडे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे पथकासह घटनास्थळी पोहोचले.
यानंतर रात्री आंधार आसल्याने शोधकार्यात अडथळे येत. सध्या या ठिकाणी जनरेटरच्या लाईट द्वारे शोधमोहीम सुरू आसुन रात्री उशिरा पर्यंत या दोघांचा शोध लागला नाही अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved