अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ १२ अहवाल निगेटीव्ह !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी १२ अहवाल निगेटीव आले असून उर्वरित ३७ अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

काल रात्री पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तसेच उर्वरित १२ अहवाल काल रात्री उशीरा प्राप्त झाले,

दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर असे एकूण ३७ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24