अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ परदेशी नागरिक पोलिस कोठडीत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  कोरोनाबाधित असलेल्या तबलिगी जमातीच्या पाच जणांचा अहवाल निगोटिव्ह आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

त्यातील दोन परदेशी नागरिकांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या अटकेची कारवाई केलेली आहे.

टुरिस्ट व्हिसा घेऊन भारतात धर्मप्रसार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

यापूर्वी 26 परदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. उर्वरित दोन परदेशी नागरिक व तीन भारतीय नागरिक कोरोनाबाधित होत.

त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाने परदेशी नागरिकांना सहा दिवस पोलीस कोठडीत करण्याचा आदेश दिला.

हे नागरिक इंडोनेशिया व जुबेती देशातील आहेत. तीन भारतीय नागरिकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24