Ahmednagar ACB Trap : अहमदनगर ब्रेकिंग ! लाच मागितल्याप्रकरणी ‘त्या’ दोघांना रंगेहाथ पकडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar ACB Trap : विद्युत रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी चक्क १५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोन वायरमन अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. सुनिल मारुती शेळके व वैभव लहू वाळके असे लाचप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

सुनिल शेळके हा प्रधान तंत्रज्ञ वर्ग ३ म्हणून तर वैभव वाळके हा बाह्यस्रोत तंत्रज्ञ (कंत्राटी वायरमन) म्हणून कार्यरत होता. अॅन्टी करप्शन (एसीबी) विभागाच्या नगर पथकाने १ मार्च रोजी ही कारवाई केली. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती, अशी माहिती एसीबीच्या पथकाने दिली.

याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या शेतातील विद्युत रोहित्र जळाले होते. ते दुरुस्त करून पुन्हा बसविण्यासाठी वीजपुरवठा खंडित करणे आवश्यक होते. हा वीजपुरवठा खंडित करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदाराने सुनिल शेळके व वैभव वाळके यांच्याकडे केली होती.

मात्र त्यांनी १५०० रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. याबाबत तक्रारदाराने अॅन्टी करप्शनच्या पथकाकडे तक्रार केली. अॅन्टी करप्शनच्या पथकाने याबाबत पडताळणी केली.

सुनिल शेळके व वैभव वाळके या दोघांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १५०० रुपये लाचेची मागणी करून सुनिल शेळके याने लाचेची रक्कम वैभव वाळके याच्याकडे देण्यास सांगितले.

या प्रकरणी वैभव शेळकेला रंगेहाथ पकडले. अॅन्टी करप्शन पथकाचे पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शरद गोर्डे, बाळासाहेब कराडे, रवि निमसे, किशोर लाड, संतोष शिंदे, सना सय्यद, हारुण शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.