अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- तुळजापूर येथे चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी मानाची काठी घेऊन निघालेल्या कर्जत तालुक्यातील भाविकांना येरमाळा (तुळजापूर) येथे अपघात झाला.
यामध्ये तीन जण ठार झाले तर सात जखमी झाले. कर्जत तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांच्या काठीला तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेमध्ये मान आहे.
त्यानुसार हे भाविक मानाच्या काठ्या घेऊन निघाले होते. तुळजापूर जवळ येरमाळा या गावातील उड्डाणपुलावर त्यांच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने पाठीमागून धडक दिली. यामध्ये सचिन भाऊसाहेब काळे (वय ३०), मंगल संपत निंबोरे (वय ६०), त्यांची मुलगी मनीषा एकशिंगवे (वय २८) हे तिघे ठार झाले.
तर भाऊसाहेब निंबोरे, अतुल निंभोरे, अनिल निंभोरे, प्रीती निंभोरे यांच्यासह काही लहान मुले जखमी झाले आहेत. जखमींनी उपचारासाठी नगरला आणण्यात आले आहे.