अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- नगर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांतील तीन चोरटे आज पहाटे ग्रामस्थांच्या हाती लागले. त्यात एक महिला आहे. आष्टी तालुक्यात त्यांना पकडल्यामुळे अंभोरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
त्यांनी नगर तालुक्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे. नगर तालुक्यातील दहिगाव ,साकत खुर्द ,शिराढोण या ठिकाणी धाडसी चोरीचा प्रयत्न केला पण नागरिक जागृत असल्याने डाव फसला.
मग चोराचा मोर्चा साकत बुद्रुक येथील भोगाडे वस्तीवर वळाला. पण या ठिकाणी चोरांची दाळ शिजली नाही. मग चोरांचा मोर्चा साकत खुर्द गावातील बोचरे वस्तीवर वळाला.
या वस्तीवरील नागरिक जागे असल्याने तेथून पळ काढत लोणी गावात वळले. तेथील डावही फसला. सातपैकी दोन पुरुष, एक महिला चोरी करताना नागरिकांच्या हाती लागले.
दहिगावमध्ये चार पाच दिवसात किराणा दुकान फोडुन मुद्देमाल किराणा सामान चोरुन नेले होते. लोणी ता.आष्टी चोर पकडले गेले. त्यामुळे अंभोरा पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®