अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पुणे – नगर रोडवरील सुपा टोलनाका चौकात एका कारची दुभाजकास धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला.

मंगळवारी (२६ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात वशीम सफीकउद्दीन मन्यार (खान) (वय २५, रा.पुणे, मूळ रा.उत्तरप्रदेश),

अक्षय सुनील मकासरे (वय २५, रा.औंध, कस्तुरबावस्ती पुणे), अमीत मोनीराम चव्हाण (वय-२५, रा.पिंप्री गुरव, पुणे) या तिघांचा मृत्यू झाला आहे

वशीम सफीकउद्दीन मन्यार (खान) हा भरधाव वेगाने घेऊन चालला होता. यावेळी सुपा टोलनाका चौकात कार एका दुभाजकावर आदळली.

कार इतक्या जोरात आदळली की पलिकडच्या रस्त्यावरुन जाणा-या ट्रकवर जाऊन आदळली.यामुळे कारमधील वरील तिघे तरुण ठार झाले. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24