अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात ट्रक कोसळला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्याकडे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक बेलापूरनजीक प्रवरानदीत सोमवारी कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

एमएच -०४ इफ पी ६६९१ हा ट्रक अकोले येथील अगस्ती कारखान्यावरून कामगारांना घेऊन राहुरीकडे जात होता. समोरून येणाऱ्या कारने हुलकावणी दिल्याने ट्रक कठडे तोडून नदीपात्रात पडला.

मात्र, पाण्यात न पडता तो दशक्रिया विधीच्या घाटावर कोसळल्यामुळे कामगार बचावले. अपघातग्रस्तांना श्रीरामपूरच्या साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. हे कामगार चाळीसगाव येथील आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24