अहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहने चिरडत ट्रक घुसला दुकानात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातील जळगाव येथे नगर- सोलापूर महामार्गावर नगरहून सोलापूरकडे जाणारा (TN- 29 BZ 9522) मालवाहतूक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुकानात घुसला.

आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा ट्रक चुंबळकर यांच्या सिमेंटच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या छोटा हत्ती व दोन मोटारसायकलला चिरडत दुकानात घुसला.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातास छोटा हत्ती व दोन टू व्हीलर मोटारसायकल आणि फरश्या आणि कडप्पाचे मोठे नुकसान झाले आहे. गाडी दुकानात घुसली हे दिसताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24