अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीच्या वादातून बारावीतील विद्यार्थ्याचा मुत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  जामखेड तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी दाडके व दगडाने झालेल्या तुंबळ हाणामारीत एका बारावीच्या विद्यार्थ्याचा मुत्यू झाला आहे.

दोन्ही गटाकडील एकुण चार जण जखमी झाले असून परस्परविरोधी विरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन यातील एकुण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अमोल अशोक वराट वय २२ (साकत) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की फिर्यादीचे वडील अशोक वराट हे आरोपींना म्हणाले की आपली जमीन मोजून घेऊ म्हणजे आपले वाद मिटतील असे म्हणाल्याचा राग आरोपींना आला

व १६ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास साकत गावातील फिर्यादीच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमा करून लाकडी दाडके, दगड, काठ्याने फिर्यादी व त्याच्या वडीलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

यामध्ये जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी अजय वराट व विजय वराट यांनी अंगणात झोपलेल्या बारावी मध्ये शिकत आसलेल्या ओमकार वराट या विद्यार्थ्याच्या डोक्यात लाकडी दांडकयाने मारल्याने तो बेशुद्ध पडला.

फिर्यादीने नातेवाईकांच्या मदतीने ओमला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र दि २३ मे रोजी सकाळी ७.४५ वा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मयताचा भाऊ अमोल अशोक वराट यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण नागनाथ वराट, अजय किरण वराट, विजय किरण वराट, सुदाम किरण वराट, उध्दव नागनाथ वराट, विनोद उद्धव वराट, बाळु उद्धव वराट, सर्व रा साकत ता. जामखेड अशा एकुण सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24