अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- अहमदनगर शहरातील नगर-पुणे रोड वरील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न करणात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या आधीही शहरात दुसऱ्या एका बँकेत असा चोरीचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी उसवाल इंपिरियल चव्हाण व सेंथॉल अस्तनदूर काळे (रा.दोघे कुरणवस्ती, वाळूंज, ता. नगर) या आरोपींना अटक केले आहे.
या दोघांनी ३० एप्रिल रोजी रात्री बँकेच्या शाखेत घुसून आलाराम व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक विजयकुमार देवकरण वाडबुदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
त्यांच्या विरोधात नगर तालुका, कोतवाली, पारनेर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com