अहमदनगर ब्रेकिंग : मजुराच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : शिर्डीमध्ये अवघ्या दोनशे रुपयावरुन मजुराची हत्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

इक्राम अजीज पठाण (रा.श्रीरामनगर,शिर्डी) व अनिल बाबासाहेब तळोले (रा.आण्णाभाऊ साठेनगर, शिर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि २२ जूनला दुपारी मयत अमित प्रेमजी सोला (रा. मुंबई) यास दोनशे रुपये उसनवारी दिलेल्या पैशाच्या कारणाहून इक्राम निजाम पठाण व अनिल बाबासाहेब तळोले यांनी मारहाण केली होती.

यात अमित हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार चालू असताना २४ रोजी तो मयत झाला. याबाबत शिर्डी पोलिसात मुनीर अजीज पठाण (रा. निमगाव, हेलीपँडरोड) यांनी दिलेल्या फिर्याद दिली.

शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिपक गंधाले व मिथुन घुगे, पी.ए.दातरे यांच्यासह पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांना अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24