अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यात एकाच दिवशी दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बेलापूर-पढेगाव रस्त्यावर एका मंदिराजवळ झाडाला गळफास घेवून एका तरुणाने आत्महत्या केली.
तसेच श्रीरामपूर रस्त्यावर एक वृध्द इसमाचा मृतदेह आढळून आला.
एकाच दिवशी या दोन घटना घडल्यामुळे संपूर्ण गाव हादरले.
आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव रवींद्र अरुण पाटोळे (वय २६) आहे.
रवींद्र याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
तसेच श्रीरामपूर रस्त्यावर एका हॉटेलनजीक वृद्धाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटू शकली नाही.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com