अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- मागील वादाच्या कारणातून एका विशिष्ट समाज्यातील दोन गटात आज दुपारी साडेचार वाजता श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्यावर तुफान हाणामारी झाली.
या हाणामारीत झालेल्या चाकू हल्ल्यात एका गटातील चौघेजण मयत झाल्याची माहिती बेलवंडी पोलिसांकडून समजली आहे मयत झालेले चौघेजण हे सुरेगाव येथील आहेत.
या दोन्ही गटात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते या वादाचे पर्यवसन आज तुफान हाणामारीत झाले दुपारी साडेचार वाजता विसापूर फाट्यावर एका गटाने दुसऱ्या गटातील चौघांना चाकूने भोसकल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला
दरम्यान बेलवंडी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अश्याप्रकारे मारामारीत चौघांची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved