अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- श्रीरामपूर- संगमनेर रस्यावर प्रभात दूध डेरी जवळ दुचाकी व ट्रक यांच्यात आज सायंकाळी ५ :३०च्या दरम्यान भीषण अपघात झाला.
या भीषण अपघातात २ जण ठार झाले झाले असून अपघातग्रस्त ट्रक मध्ये लोखंडी सळया असल्याचे समजले आहे.
अपघातात बाळासाहेब यशवंत कोते (शिर्डी ) व अनिल निकम (कोपरगाव ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दोघेही श्रीरामपूर बस डेपोचे सहाय्यक आधिक्षक व सहाय्यक निरिक्षक परिवहन महामंडळ कर्मचारी असल्याचे समजते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com