अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी (१२ ऑगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला.
ठार झालेल्यांमध्ये कर्जत-अमरापूर रस्त्यावरील कामाचा अभियंता व मजुराचा समावेश आहे. हा अपघात दुपारी अडीचला झाला. कर्जत-अमरापूर रस्त्याचे काम सुरू आहे. टेम्पोत (एमएच ४३/एफ-५८६) टिकाव, फावडे, घमेले व सिमेंटच्या गोण्या टाकून पाच मजूर आणि अभियंता जोगेश्वरवाडी येथून मिरजगावकडे निघाले.
चौफुलीवर श्रीगोंद्याकडून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंट बल्करची (एमएच ४४/८१८१) धडक बसली. पुढे बसलेले अभियंता व मजूर जागीच ठार झाले, तर मागे बसलेले चौघे गोण्यांखाली दबून जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.
संदीप दादाराव मिरेकर (२८, मोतखेड, ता. लोणार, जि. बुलढाणा) व भिवाजी जोगेंद्र जोंधळे (२६, सोनपल्ली, ता. श्रीकोंडा, जि. आदिलाबाद) हे दोघे जागीच ठार झाले.
जखमींमध्ये विष्णू राम वेताळकर (२६) व विनोद सुभाष गुंजकर (२६, दोघे उकळी, ता. मेखर), नितीन हुलगुंडे (२१, माजलगाव), गोपाळ अशोक पवार (२४, भोदखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांचा समावेश आहे. पळून गेलेला सिमेंटी बल्कर टाकळी खंडेश्वरी येथील तलावाच्या सांडव्याजवळ आढळला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved