अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत ताहराबाद येथे राहणाऱ्या संपत बर्डे (वय ३५) या तरूणाचा १५ जुलै रोजी अज्ञात कारणाने मृत्यू झाला.
तर दुस-या घटनेत वांबोरी येथील शुभम् ढगे (वय २२) तरुणाचा १४ जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला. संपत पोपट बर्डे हा तरूण अज्ञात आजाराने आजारी होता.
त्यामुळे त्याला उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रूग्णालय येथे दाखल केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले.
तर शुभम् ढगे हा तरूण घरातून भंगार गोळा करण्याची प्लास्टीक गोणी घेऊन गेला. तो भंगार गोळा करीत असताना वांबोरी गावाच्या खाणीत पाय घसरुन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com