अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टरखाली चिरडून दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेतील मृतांमध्ये चालकाचा समावेश आहे. शुभम दत्तात्रय लोहकरे व भगवान श्रीरंग उकीरडे अशी मृत तरुणांची नावे आहेत.

उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. ही घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली.

जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जेटकेवाडी (जि.उस्मानाबाद) येथून उसाचे वाढे घेऊन एक ट्रॅक्टर धनेगावच्या दिशेने येत होता.

यावेळी धनेगाव परिसरातील कॅनॉलच्या अवघड वळणाचा अंदाज न आल्याचे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर जागेवरच उलटला.

यामुळे ट्रॅक्टर जागेवर पलटी झाला. या अपघातात शुभम दत्तात्रय लोहकरे (वय 14) व भगवान श्रीरंग उकीरडे वय 22 हे दोघे ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच ठार झाले. या घटनेमुळे धनेगाव परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24