अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे दोन आणखी रुग्ण आढळले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आता आणखी दोन रुग्ण मिळून आले आहेत. ही दोघे मुंबई हून आलेले असून त्यांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

आज त्या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पिंपळगाव खांड येथील एक हजार लोकसंखेच्या गावात खळबळ उडाली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या चार दिवसांपुर्वी अकोेले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे एक वयोवृद्ध महिला मुंबईहून गावाकडे आली होती.

त्यावेळी तिला काही कोरोनाची लक्षणे आढळून आले होते. त्याबाबत दक्षता घेत आरोग्य विभागाने संबंधित महिलेस तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले होते. तिचा रिपोर्ट काल उशिरा अकोले प्रशासनाला प्राप्त झाला होता.

या महिलेस क्वारंटाईन केले असता तेथील परिस्थिती आटोक्यात येईल असे वाटत होते. मात्र, यानंतर आणखी दोघांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.

आज दुपारी त्या दोघांचा अहवाल अकोले प्रशासनाला समजला आहे. त्यात दोघे पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने पिंपळगाव परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24