अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकी स्वार जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  नगर-दौंड महामार्गावरील घुटेवाडी फाट्यावर दुचाकी व स्विफ्ट गाडीची सामोरा समोर धडक होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Breaking)

संतोष चव्हाण असे मृताचे नाव आहे. नगर दौंड रोड वर अपघातांची मालिका सुरूच आहे. तालुक्यातील घुटेवाडी फाट्यावर चिखली घाटात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष चव्हाण रा.भुतकरवाडी, सावेडी हे दौंड कडून नगरकडे ॲक्टिवा दुचाकी एमएच १६ बीक्यू ७७८ वरून जात असताना

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

चिखली घाट परिसरात ओव्हर टेक करत असताना नगर कडून दौंडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट एमएच १२ जेझेड ७१७२ ने धडक दिल्याने दुचाकीस्वार चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती रस्त्याने जाणारे दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना दिली.

त्यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवत पंचनामा केला.