अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-दि ०८ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री ०१-३० वा.चे सुमारास शेवगाव मधील शास्त्रीनगर येथे रामचंद्र उर्फ रामजी साहेबराव सातपुते यांना पिस्टलच्या दोन गोळया लागुन ते गंभीर जखमी होवुन मयत झाले होते.
सदरबाबत शेवगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन मयताची पत्नी शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते हिचे विरुध्द दिनांक ३०/१२/२०१७ रोजी शेवगांव पोलीस स्टेशनला भादंविक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी केला. बॅलेस्टिक एक्सपर्ट,न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई यांचेकडुन अभिप्राय प्राप्त करुन घेतला.
त्यामध्ये सदर गुन्हयातील आरोपी नामे श्रीमती.शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते (मयताची पत्नी)हिचेविरुध्द पुरावा मिळुन आल्याने तिला सदर गुन्हयाचे कामी दिनांक २३/१२/२०२० रोजी अटक करण्यात आली.
तिला न्यायालयाने दिनांक २८/१२/२०२० पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री.मनोज पाटील साो, पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर व मा.श्री.सौरभकुमार अग्रवाल,
अपर पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सुदर्शन मुंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव उपविभाग शेवगांव,पोहेकॉ.नितिन दराडे, पोना.संजय बडे,म.पो.कॉ. रोहिणी घरवाढवे करीत आहेत