अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- डोक्यावरुन टायर गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून धक्कादायक म्हणजे सदर टेम्पोच्या ड्रायव्हरने दारू पिवून वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपुर तालुक्यातील गोंधवनी भैरवनाथनगर येथील शेतमजुरी करनाऱ्या अर्चना तिड्के व सरोदे या महिला शेती काम करुन सुट्टी हौउन घरी चालल्या होत्या
यावेळी येथील फरगडे वस्ती वरील मारुती मंदीर समोरील वळनावर आयशर टेम्पो क्र.Mh-17 BD 0015 या टेम्पोच्या मद्यधुंद ड्रायव्हर ने धडक दिली
त्यानंतर झालेल्या अपघातात एका महिलेच्या डोक्यावरुन पुढील टायर गेल्याने सदर महिला जागीच ठार झाली. दरम्यान दुसरी महिलेची परिस्थीती गंभीर आसल्याचे समजते.
या रस्त्यावर लॉक डाउन आसल्यामुळ मोठ्या प्रमानात वाहतुक सुरु आसून वाळू तस्करी ही मोठ्या प्रमाणात चालते. रात्री बेरात्री वाळू वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होत असते. या वाहतुकीचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®