अहमदनगर ब्रेकिंग : क्वारंटाईन केलेल्या महिलेचा मृत्यू, नागरिकांत भीतीचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-   गावपातळीवरील क्वारंटाईन कक्षात ठेवलेल्या साठवर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नगर येथे पुढील उपचारासाठी रूग्णवाहिकेतून नेले जात होते. मात्र, रस्त्यातच मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, संबंधित महिला 13 मे रोजी नवी मुंबई (वाशी) येथून राशीनला आपल्या मुलीकडे आली होती.

त्यांना दम्याचा, घशाचा त्रास होत असल्याने 16 मे रोजी संबंधित महिलेची नगरला वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार देऊन

राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना क्वॉरंटाईन केले होते.

बुधवारी रात्री या महिलेस दम लागत होता, घसाही दुखत होता आणि तापही आला असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील जिल्हा रूग्णालयात 108 रूग्णवाहिकेने नेले जात होते.

मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या महिलेस रक्तदाब, मणक्‍याचा विकारही असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी सांगितले.

क्वारंटाईन कक्षातील या महिलेच्या मृत्यूने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24