अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- श्रीरामपृरचे आमदार लहू कानडे कोरोनातुन मुक्त झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आता श्रीरामपूर शहरातील एका युवा नेत्याला आज कोरेनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
सदर युवा नेल्याची आणि त्यांच्या पत्नीची कोरोनाची रॅपिड टेस्ट आज दि. २५ सकाळी पॉझिटिव्ह आली. त्यापुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
सदर युवा नेते हे मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक असून त्यांच्या पत्नी श्रीरामपुर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून या युवा नेत्याला सर्दी होती.
त्यानंतर काल ताप आल्याने सदर युवा नेत्याची आज शनिवारी सकाळी कोरोनाची रँपिड टेस्ट घेण्यात आती. या रॅपिड टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर युवा नेत्यास श्रीरामपूर येथील संतलुक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
त्यानंतर सदर युवा नेत्याच्या पत्नीसही सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांचीही कोरोनाची रॅपिड टेस्ट आज करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे दोघांवरही तातडीने उपचार सुरू करण्यात आले. श्रीगमपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून चिंतेत भर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवाय श्रीरामपूर शहरात लॉकडाऊन घेण्यासंदर्भालही राजकारण झाल्याने त्यावरही आता कोणी बोलायला तयार नसल्याने श्रीरामपुरात कोरोना प्रसार रोखणे आव्हान ठरणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com