अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- अहमदनगर शहरातील तांबटकर मळा याठिकाणी एका विहिरीमध्ये अज्ञात इसमाने दुपारी चार ते पाच ते सुमारास व्हेरी मध्ये उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना समजताच तोफखाना पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली व त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क करून घटनास्थळी धाव घेतली.
महानगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाला त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान त्या व्यक्तीने आपल्या अंगावरचे कपडे व मोबाईल विहिरीच्या शेजारी सोडून दिले आहे,अद्याप त्या व्यक्तीला विहिरीत शोधण्याचे काम सुरू आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®