अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकीच्या भीषण अपघातात तरुण ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द- शिबलापूर रस्त्यावरील आश्वी खुर्द शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला भीषण अपघात झाला.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वैभव मच्छिद्रं वाघमोडे (१९) (रा. अंभोरे, ता. संगमनेर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंभोरे येथील दोन तरुण आश्वी परिसरात मुरघास कुट्टी करुन मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आश्वी खुर्द- शिबलापूर रस्त्यावरुन अंभोरेकडे जात होते.

वैभव वाघमोडे (१९), आकाश भानुदास रुपनर (२०) यांच्या मोटरसायकल क्रमांक एम. एच. १७ ऐ. जी. ८७७४ या दुचाकीला अज्ञात वाहणाने जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले.त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचारा दरम्यान वैभव वाघमोडे याचा मृत्यू झाला.

वैभव हा वाघमोडे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई,वडील,बहिण असा परीवार आहे. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24