अहमदनगर ब्रेकिंग : इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- संगमनेर शहरातील गणेशनगरमधील मोरया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. हर्षदा मिलिंद इंगळे असे तिचे नाव आहे. हर्षदाने नुकताच बारावीत प्रवेश घेतला होता. वडील मिलिंद इंगळे भंडारदरा जलविद्युत केंद्रात काम करतात.

शनिवारी सकाळी हर्षदाने बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन उडी घेतली. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी ही घटना पाहताच शहर पोलिसांना माहिती दिली.

गंभीर जखमी झालेल्या हर्षदाला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यापूर्वीच ती मरण पावली होती. शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24

 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24