अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा पाटात बुडून मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- श्रीरामपूर येथील तेजस दळवी या १८ वर्षांच्या युवकाचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी त्याचा मृतदेह सापडला.

तेजस शनिवारी दुपारी दिऊरा रोडवरील गणपती मंदिराच्या मागे पोहोण्यासाठी चार-पाच मित्रांसह गेला होता.

तेजसला पोहता येत नसल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो बुडाला.

तेजस पाण्यात वाहून गेल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर शोधकार्य सुरु झाले, पण तोपर्यंत खूप उशिरा झाला होता.

रविवारी पाटबंधारे खात्याने पाण्याचा प्रवाह कमी केल्यानंतर दुपारी दशक्रिया विधीस्थळाजवळील पुलाजवळ तेजस मृतदेह सापडला.

त्याचा मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24