अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास अधिकाऱ्याची आत्महत्या ! परिसरात खळबळ …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा परिषदेचे ग्राम विकास अधिकारी झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (ता.पाटोदा, जि.बीड) दरीत उडी मारून आत्महत्या केली.

ते पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयात होते पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केली आहे

आत्महत्येची ही घटना आज दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली .ही घटना कळताच पाटोदा पोलीस स्टेशन चे पी.आय. पाटील साहेब व सौताडा येथील ग्रामस्थ घटनास्थळी भेट दिली

या वेळी धबधब्याजवळ सदरील इसमाची बॅग सापडली यामध्ये एक ओळख पत्र सापडले या वरून हा इसम नाव झुंबर मारुती गवांदे ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालय श्रिगोंदा असे आहे

असे प्राथमिक माहिती आहे व या वेळी पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली. सदर आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

उंचावरून दगडात पडलेल्या मृतदेहाला बाहेर उद्या सकाळ ची वाट पाहावी लागणार असुन कसरत करावी लागणार आहे.सौताड्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.