अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : पारनेर तालुक्यातील जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्यावर विद्युत मोटारीच्या पाईपचे लिकेज काढण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या एका तरुणाचा पाण्यातील लोखंडी रॉड डोक्यात घुसल्याने जागीच मृत्यु झाला.
बुधवार दि.10 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रमोद बाळासाहेब गायकवाड (वय 35) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जवळे येथील प्रमोद बाळासाहेब गायकवाड हे नेहमीप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले होते.
परंतु, विद्युत पंप का चालू होत नाही म्हणून जवळे येथील तिकोणे वस्ती लगत असणार्या सिद्धेश्वर ओढ्यावरील बंधार्यात प्रमोद उतरले. परंतु,
पाण्यात असणार्या लोखंडी गजाचा अंदाज न आल्याने सदर लोखंडी गज डाव्या डोळ्यात घुसून डोक्यातून आरपार निघाला त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले.
सकाळी नऊ वाजता शेतात गेलेला प्रमोद अजून घरी का नाही आला म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. परंतु, दिसून न आल्याने शेजारीच
असणार्या बंधार्याच्या कडेला चप्पल व कपडे दिसून आल्याने काही तरुणांनी बंधार्यात उड्या मारून शोधाशोध सुरू केली असता एक जणाच्या पायाला मृतदेह लागला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews