अहमदनगर – नगर शहरातील रेसिडेन्शियल हायस्कूलमधील शिपायाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिपायाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकाकडून त्या शिपायावर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
सविस्तर असे की, 12 वर्षीय विद्यार्थिनी रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे शिक्षण घेत आहे. तेथे काम करणारे शिपाई लगड (पूर्ण नाव माहित नाही) यांनी सदर विद्यार्थिनीशी दोन वेळेस लज्जास्पद वर्तन केले.
तोफखाना पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिपाई लगड याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.