अहमदनगर शहरातील ‘हा’ परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :अहमदनगर शहरातील भिस्तबाग परिसरात कोरोना रूग्ण आढळल्यानंतर हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला. हे प्रतिबंध २६ जुलैपर्यंत आहेत.

भिस्तबाग परिसरातील अयोध्यानगर, पाइपलाइन रस्ता या परिसरात रूग्ण आढळत आहेत. फैलाव रोखण्यासाठी हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला.

भिस्तबाग, अयोध्यानगर, काैशलघर, सुपर क्लिनर्स, उत्तरेकडील ओढा, शेंदूरकर घर, पिंपरकर घर, मचे घर व कौशल नगर हा भाग कंटेन्मेंट झोनमध्ये आहे.

बफर झोनमध्ये कौशल्यनगरी, गजानन कॉलनी, संगीतनगर, सिमला कॉलनी, दत्त मंदिर परिसर, विवेकानंद कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, आशियाना कॉलनी, साईबन कॉलनी, किसनगिरीबाबानगर हा भाग आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24