अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ०७, अकोले तालुका ०२ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला आणि पदमा नगर येथील ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला,
६० वर्षीय पुरुष, ११ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षाचा युवक बाधित आढळून आला आहे.यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हे सर्व रुग्ण आहेत.
अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील २६ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ३५ वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे.हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
९० वर्षांच्या आजीबाईसह ४ जणांची कोरोनावर मातजिल्ह्यात आज १० व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews