अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एका दिवसात ६ मृत्यू, वाचा चोवीस तासांतील सविस्तर अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान,काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०१५ इतकी झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११६ आणि अँटीजेन चाचणीत १३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३०, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०१,पाथर्डी ०३, संगमनेर २० अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७,अकोले ०२, 

जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, पारनेर १५, पाथर्डी ०३, राहाता १२, राहुरी ०१, संगमनेर २८,शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १३ जण बाधित आढळुन आले.मनपा ०३, जामखेड ०१, पाथर्डी ०१, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १८,पारनेर १३, पाथर्डी ०४, राहाता २४, राहुरी ०८, संगमनेर २१, शेवगाव १०, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७३२८२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १०१५
  • मृत्यू:११४०
  • एकूण रूग्ण संख्या:७५४३७
  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24